February 9, 2026

लोक जनशक्ती पार्टीचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

  • कळंब — लोक जनशक्ती पार्टी (आर) च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि गायरान जमीन परिषद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी,रविवार,सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती सभागृह, कळंब येथे करण्यात आले आहे.
    या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ (अण्णा) गायकवाड करणार असून,येणाऱ्या ग्रामपंचायत,पंचायत समिती,
    नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, प्रदेश महासचिव प्रशांत ननवरे,अशोक गायकवाड (प्रदेशाध्यक्ष सोलापूर),रामकुमार सोनवणे (महाराष्ट्र किसान सेल अध्यक्ष),प्रा.बी.पी.शिरसाट (जिल्हाध्यक्ष),आर.राजेश वाहुळे आणि किशोर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    आयोजक मंडळात मुकेश गायकवाड,नागेश धीरे,बाबा टोपे, भारत कदम,सुनील गायकवाड, सुशील गायकवाड,दिनेश वाघमारे, धम्मदीप बचुटे,संजय गायकवाड, सतीश चंदनशिवे,निलेश गवळी, सुरज राऊत,बजरंग धावारे,बापू टोपे,श्याम हौसलमल तसेच महिला पदाधिकारी सौ.रेखा चंदनशिवे,चांदणी सावंत,सुलभा गायकवाड,शितल गायकवाड, शिल्पा वाघमारे आदींचा समावेश आहे.
    सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पक्ष बळकटीकरणाच्या या उपक्रमाला यशस्वी करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!