धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 109 कारवाया करुन 81,950 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-विमल शामराव चव्हाण, वय 50 वर्षे, रा. अंबेजवळगे तांडा ता. जि. धाराशिव या दि.22.10.2025 रोजी 15.40 वा. सु घाटंग्री गावाजवळ पुलावर अंदाजे 2,720 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 68 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.तर आरोपी नामे-बापु भगवान पवार, रा. वरुडा पारधी पीडी ह.मु. उपळा शिवार ता. जि. धाराशिव हे दि.22.10.2025 रोजी 18.30 वा. सु कालिदास पंडवळ यांचे शेताजवळ तेर जाणारे रोडलगत उपळा शिवार येथे अंदाजे 13,230 ₹ किंमतीचे 200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-अशिनी लक्ष्मण पवार, वय 20 वर्षे, रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर ह.मु. कन्हेरवाउी ता. कळंब जि.धाराशिव हे दि.22.10.2025 रोजी 18.30 वा. सु आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 7,000 ₹ किंमतीची 10लिटर गावठी दारु व 75 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
आंबी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आंबी पोलीसांनी दि.22.10.2025 रोजी 17.15 वा. सु. आंबी पो ठाणे हद्दीत देवगाव येथे समाज मंदीराचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-लक्ष्मण निवृत्ती टाळके, रा. राळेसांगवी, शिवाजी प्रल्हाद काकडे, वय 52 रा. देवगाव, रविंद्र शामराव काकडे वय 40 रा. देवगाव, अमोल सतृयववान गरजमल, वय 37 रा. देवगाव, सिचन ज्ञानदेव जावळे, वय 39 वर्षे, रा. देवगाव हे 17.15 वा. सु. देवगाव येथे समाज मंदीराचे पाठीमागे तिरट मटका जुगाराचे साहित्या एकुण 2,750 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आंबी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून बांधून ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
येरमाळा पोलीस ठाणे आरोपी नामे-आशिफ खलील कुरेशी, वय 40 वर्षे, रा. पापनास ता. माढा जि. सोलापूर, आदनान खलील कुरेशी, वय 22 वर्षे, रा.समतानगर अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी दि.22.10.2025 रोजी 00.30 वा. सु.वडगाव ज. शिवार एनएच 52 रोडलगत आयशर टेम्पो क्र एमएच 42 गी 9028 मध्ये गोवंशीय जातीचे 14 जर्सी गायी 1,40,000₹ किंमतीचे वाहनासह 4,90,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जातीचे गायी त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करत असताना येरमाळा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (ए),11(1) (डी), 11 (1)(के), 11(1)(आय) सह कलम 5, 5(ए), 5 (बी), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.” परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-ओंकार विलास वाघमारे, वय 24 वर्षे, रा. शिक्षक सोसायटी परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 1970 ही दि.20.10.2025 रोजी 14.00ते 16.00 वा. सु.ओंकार वाघमारे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ओंकार वाघमारे यांनी दि.22.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-अझहर मैनुद्दीन शेख, वय 38 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.10.2025 रोजी 03.00 वा. सु. नळदुर्ग येथील बसस्थानका जवळ गौरी हॉटेल समोर फिर्यादी नामे-आयुब अब्दुल गणी शेख, वय 35 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने नेताच्या बातम्या का लावत नाही या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,चाकुने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आयुब शेख यांनी दि.22. 10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 109, 115(2), 352, 351 (2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक