इटकुर – महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरणासाठी स्थापन झालेल्या स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार २२ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उद्घाटन कळंब-धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,माजी आमदार दयानंद गायकवाड,सचिन काळे,धनंजय शिंगाडे,महादेव महाराज आडसूळ,प्रताप पाटील,पांडुरंग कुंभार,प्रा.श्रीधर भवर,बाळकृष्ण तांबारे,डॉ.संजय कांबळे,बाबुराव बावळे,बालाजी जाधवर,भारत सांगळे,राजेश ढेंगळे,गावाचे सरपंच मोहरबाई कस्पटे,उपसरपंच विलास गाडे,अरुण बावळे,आबासाहेब आडसूळ,ज्ञानदेव गंभीरे,भागवत चौधरी,रामेश्वर शिंदे,करंजकल्याचे माजी सरपंच विशाल पवार, स्वप्ननगरी कॉलनीचे अध्यक्ष दिलीप टोणगे,ग्रामपंचायत सदस्य कन्हेरवाडी वसुदेव सावंत,माजी सरपंच विनोद जाधव,चंद्रकांत जाधव,श्रीकांत मिटकरी, विवेकानंद मिटकरी,दयानंद जगताप,अंगद आगलावे,भगवान कवडे,उमकांत मिटकरी,कार्यकारी अभियंता दत्तात्रय आडसूळ,माजी जि.प.सदस्य मधुकर सावंत, विश्वजीत जाधव,सागर बाराते, प्रदीप मेटे,विठ्ठल कोकाटे,दिलीप वाघमारे,तुषार वाघमारे,श्रीकांत गंभीरे,मुस्तदीक काझी,विजय माने,विलास तोडकरी,भारत जाधव,ओम गंभीरे,बोरगाव धनेश्वरीचे सरपंच हनुमान सांगळे, पिंपळगाव कोठवळा सरपंच ज्ञानेश्वर तांबडे,दत्तात्रय बावळे, चंद्रकांत शिंदे,बहुला सरपंच आश्रुबा बिक्कड,भोगजीचे सरपंच बालाजी आडसूळ,रोहित आडसूळ,रामहरी खराटे,उत्कर्ष आडसूळ,स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शन चे अध्यक्ष रामेश्वर जाधवर,उद्योजक राहुल गवळी,सामाजिक कार्यकर्ते कचरू टकले, पत्रकार दैनिक लोकमत,दैनिक पुढारी,राजकीय कट्टा चे संपादक सतीश मातने, दैनिक जनमत चे प्रतिनिधी बालाजी देसाई यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, पदाधिकारी,सरपंच-उपसरपंच, पत्रकार,युवा उद्योजक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नपूर्ती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आणि पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल माने यांनी केले. सूत्रसंचालन महादेव खराटे यांनी प्रभावीपणे पार पाडले,तर आभार प्रदर्शन पतसंस्थेच्या चेअरमन शोभा विठ्ठल माने यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्वप्नपूर्ती मित्रमंडळ व स्वप्नपूर्ती बँकेच्या सर्व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड