कळंब (राजेंद्र बारगुले यांजकडून ) – संविधान दिना दिवशी कळंब येथील अनेक शासकीय कार्यालय कुलूप बंद असल्याचे निदर्शनास आले होते. याविषयी सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी तक्रार दाखल करुन संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.या गंभीर विषयाची कळंब तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन कळंब शहरातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख यांना संविधान दिन साजरा केला किंवा कसे याचा फोटो सह स्वयंस्पष्ट अहवाल तात्काळ २ दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले. ज्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद,गटविकास अधिकारी, पंचायत समिती,तालुका कृषी विभाग,उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गट शिक्षणाधिकारी,पशुधन विकास अधिकारी,उप विभागीय अभियंता,पाटबंधारे उपविभाग, महिला व बाल विकास अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प, दुय्यम निबंधक, सहाययक निबंधक सहकारी संस्था,उप अभियंता दुरसंचार निगम लि,उप अभियंता म.रा.वि.वि.कंपनी,तालुका आरोग्य अधिकारी,उपअधिक्षक भुमी अभिलेख,आगार प्रमुख म.रा.प.मं, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेत विदयालय,अधिक्षक शासकीय वस्तीगृह,वैदयकीय अधिकारी शासकीय रुग्णालय, सामाजिक वनीकरण, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे,उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब या सर्व कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे. संविधान दिन यादिवशी बंद असलेले शासकीय कार्यालय काय अहवाल पाठवतात याकडे कळंब तालुक्याचे लक्ष लागले आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी