कळंब – लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) पक्षाच्या वतीने विविध स्थानिक आणि सामाजिक मागण्यांसाठी तहसीलदार,तहसील कार्यालय कळंब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पद्मश्री दादासाहेब सबलीकरण योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना मिळावा,तसेच गेल्या १५ ते २० वर्षांपासून गायरान जमिनीचा ताबा असलेल्या भूमिहीन अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना त्या जमिनींचे वाटप करून सातबाऱ्यावर नोंदी करण्यात याव्यात,अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित न करता त्याच ठिकाणी विस्तारीकरण करावे,शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लवकर घ्यावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे,संजय गांधी निराधार व राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी मानधन मिळावे आणि शिधापत्रिकाधारकांना साखर,तेल,रवा यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात यावे,अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या. या सर्व मागण्यांवर तत्काळ निर्णय न झाल्यास दिनांक २६ ऑक्टोबर रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,युवा जिल्हाध्यक्ष मुकेश गायकवाड, तालुका अध्यक्ष भारत कदम, शहराध्यक्ष नागेश धीरे,तसेच राहुल बनसोडे,बाबा टोपे, भिवाजी ताकपिरे,बळीराम दहिरे,बालाजी वाघमारे,दत्ता चंदनशिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड