धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची काढणी-मळणी पूर्ण झाली असली तरी अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात व्यापारी सध्या फक्त 3000 ते 3500 रुपये दर देत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नाफेडमार्फत केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 5328 रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने तात्काळ सोयाबीन खरेदी सुरू करावी,अशी मागणी केली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, नाफेडची नोंदणी व खरेदी केंद्रे त्वरित सुरु न केल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होईल.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत,तसेच आवश्यक असल्यास भावांतर योजनेचीही अंमलबजावणी करावी,अशी विनंती त्यांनी केली आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान