May 11, 2026

अंजली ढवळे यांना “डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार”प्रदान

  • कळंब – तालुक्यातील दहिफळ येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली ढवळे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल “डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशन संस्थेतर्फे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    अंजली ढवळे गेली दहा वर्षे महिला सक्षमीकरण,बचत गट चळवळ आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहेत.तसेच वसुंधरा पाणलोट व्यवस्थापन प्रशिक्षण व उमेद अभियानांतर्गत गटांना प्रशिक्षण देण्याचे काम त्या करीत आहेत.त्यांच्या या सामाजिक बांधिलकी व कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
error: Content is protected !!