धाराशिव-आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत,कार्यतत्पर आणि समाजकारणात सक्रिय असलेले भाई फुलचंद अंबादास गायकवाड पाटील (सिद्धार्थ नगर,धाराशिव,ता.जि.धाराशिव) यांची रिपब्लिकन सेना,धाराशिव जिल्हा महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनाच्या आदेशानुसार,धाराशिव जिल्हा प्रभारी कपिल सरोदे आणि जिल्हाप्रमुख अनिल हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक.05/1025 रो झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एकमताने करण्यात निवड आली. या नियुक्तीनंतर गायकवाड पाटील यांनी सांगितले की, मी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे विचार,तत्त्वे आणि चळवळ धाराशिव जिल्ह्याच्या प्रत्येक गावात पोहोचवण्याचा दृढ निश्चय केला आहे.रिपब्लिकन सेनेची संघटना अधिक जोमाने उभी करण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांसह सातत्याने प्रयत्न करत राहीन.” या नियुक्तीबद्दल सर्व आंबेडकरी बांधव,रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाई फुलचंद गायकवाड पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर