उमरगा – समाज संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कळंब तालुक्यातील सातेफळ,हळदगाव आणि सौंदाना परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. एकूण ३०० रेशन किटचे वाटप करून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली. ही मदतकार्य मोहीम उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन,महाराष्ट्र लोकविकास मंच आणि समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.या कार्यात महावीर डोके आणि त्यांचा मित्रमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी भूमिपुत्र वाघ,विद्या ताई वाघ,हरिश्चंद्र ढाकणे,मनीषाताई गुंजाळ,मारुती शिरसाट, मनीषाताई घुले,विकास कुदळे, शीतल गहेरवार,प्राचार्य वेंकट अणिगुंठे आणि ॲड.दिलीप कांबळे यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाज संस्थांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी