कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रेरणेने आणि ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयात अभिष्टचिंतन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.भगवान यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास संचालक प्रा.वसंत मडके,उपप्राचार्य तथा साक्षी पावनज्योत वृत्तपत्राचे उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,प्रा.डॉ.अभिजीत मोहेकर,उपसंपादक अरविंद शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांना महाविद्यालयातील विद्यार्थी, सहकारी व कर्मचाऱ्यांकडून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी