कळंब – येत्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने आपली संघटनात्मक ताकद दाखवित कळंब शहरात जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.पक्षाच्या वतीने आयोजित निवडणूक तयारी बैठकीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची उपस्थिती लक्षणीय होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करदादा खोसे,तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे,कार्याध्यक्ष अॅड.प्रवीण यादव,महिला जिल्हाध्यक्ष सरलाताई खोसे व युवक तालुकाध्यक्ष अमर मडके यांनी मार्गदर्शन केले.ही बैठक पक्षाचे शहराध्यक्ष दत्तात्रय तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.११ ऑक्टोबर २०२५ वार शनिवार रोजी पक्षाच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी पक्षाने सर्व २० नगरसेवक जागा तसेच नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.तसेच ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी समाजातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. नेत्यांनी कार्यकर्त्यांना संघटित राहून जनतेशी थेट संवाद साधण्याचे,स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्याचे व जनहिताच्या मुद्यांवर प्रचार करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी युवक शहराध्यक्ष विक्रम चोंदे,युवक प्रदेश चिटणीस शंतनू खंदारे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे,भैय्यासाहेब खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, युवक शहर उपाध्यक्ष अभिजीत हौसलमल,अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मुस्तफा शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सोहेल शेख, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन ठानअंबिर,अनिशुद्दीन काझी,अभिजीत कदम,हमीद भाई खान,रंजीत घुले,अशोक ईके आणि खंडू निंगोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीत नगरपरिषदेच्या राजकीय समीकरणांवर सखोल चर्चा झाली असून,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळी “स्वबळावर विजय मिळवण्याचा” निर्धार स्पष्ट केला आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्साह दिसून आला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन