विद्याभवन हायस्कूलच्या विद्यार्थिनींची कल्पकता उजळली
कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे अध्यक्ष अनिल मोहेकर तसेच सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू बनविण्याचा उपक्रम राबविला. या अंतर्गत विद्यार्थिनींनी विविध टाकाऊ साहित्याचा वापर करून सुंदर,आकर्षक आणि नाविन्यपूर्ण अशा आकाश कंदिलांची निर्मिती केली.
हा उपक्रम मराठी विभाग प्रमुख आणि नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यअनुभव विषयांतर्गत राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना “टाकाऊ पासून टिकाऊ” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी श्रमप्रतिष्ठा, व्यावहारिक कौशल्य,उद्योजकता, कृतीआधारित शिक्षण आणि नाविन्यपूर्णतेचे महत्त्व स्पष्ट केले.या उपक्रमात विद्यार्थिनींनी केवळ कंदीलच नव्हे तर इतर उपयुक्त वस्तूही तयार केल्या. स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेल्या या वस्तूंनी विद्यार्थिनींमध्ये आनंद, आत्मविश्वास आणि कौशल्यविकास वाढविला.
या उपक्रमात एकूण सोळा विद्यार्थिनी सहभागी झाल्या – कु. नेत्रा दशवंत, जान्हवी नागवसे, जान्हवी शेळके, श्रेया देशमाने, समीक्षा वाघमारे, शिवकन्या गायकवाड, समृद्धी गायकवाड, साक्षी गायकवाड, सोफिया पठाण, अक्षरा महामुनी, मधुरा वेदपाठक, समृद्धी घंटेवाड, अंकिता लांडगे, सिद्धी कवडे, श्वेता तांबारे, साक्षी काळे.
या नवोपक्रमाबद्दल मुख्याध्यापक व्ही.जी.कुंभार,उपमुख्याध्यापक व्ही.एस.मायाचारी, पर्यवेक्षक जे. एन. कोळी यांनी शिक्षक सोपान पवार आणि सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन