कळंब-भाषाही माणसा माणसांना जोडून माणुसकी निर्माण करण्याचे काम करत असते त्यामुळे भाषा ही आपली आत्मा असून भाषेमुळे समाजभान जागृत राहते व समाजातील माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम ही भाषा करत असते असे प्रतिपादन डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले ते तालुक्यातील हासेगाव (केज )येथील पद्मश्री शंकर बापू माध्यमिक विद्यालयात आयोजित अभिजात भाषा सप्ताह या उपक्रमा अंतर्गत व्याख्यानात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून गावचे ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब यादव, प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच महादेव यादव व शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर पालकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.पुढे बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, मराठी भाषाही जगात कोट्यावधी लोक बोलतात त्यामुळे या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा गेल्या वर्षी प्राप्त झाला असून तब्बल एक तपानंतर या भाषेला सरकारने न्याय दिला आहे त्यांनी याबद्दल राज्य व केंद्र सरकारचे आभार मानले भाषा ही एकमेकात संवाद साधण्याचे साधन आहे या संवादातूनच एकमेकांमध्ये प्रेम व आपुलकीची भावना तयार होत असते त्यामुळे भाषाही माणसे जोडण्याचे उत्तम साधना असून आपण आपल्या भाषेवर प्रेम केले पाहिजे आपण अनेक भाषा शिकलो तरी ज्यावेळेस आपल्यावर संकट येते त्यावेळेस पहिला उच्चार हा आपल्या मातृभाषेचा होतो त्यामुळे मातृभाषा जन्मभूमी व कर्मभूमी हे तीन घटक आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपण अनेक भाषा शिकल्या तरी आपल्या भाषेवर आपलं प्रेम कायम असणे गरजेचे आहे यावेळी शाळेतील तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले.सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक विवेक झाडपिडे यांनी केले तर आभार कोल्हे दत्तात्रेय यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित हजारे, बाबासाहेब दराडे ,गालफाडे रविंद्र आदींनी प्रयत्न केले यावेळी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”