कळंब — सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर वकील राकेश किशोर या व्यक्तीने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध करत लोक जनशक्ती पार्टी धाराशिव जिल्हा शाखेने राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांनी नमूद केले आहे की, “हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधानाच्या मूल्यांवर झालेला गंभीर आघात आहे. समाजात वाढणाऱ्या मनुवादी व जातीयवादी प्रवृत्ती या लोकशाहीसाठी धोकादायक ठरत आहेत.” पक्षाने मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत — आरोपी वकील राकेश किशोर याच्यावर कठोर कलमान्वये कारवाई करावी, सर्वोच्च न्यायालयासह देशातील सर्व न्यायालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी,जातीय द्वेष व मनुवादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून केंद्र सरकारने न्यायव्यवस्थेच्या गौरव आणि स्वायत्ततेच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. या प्रसंगी बाळासाहेब धम्मपाल वाघमारे,बाबा टोपे, मुकेश गायकवाड,सुंदर जगताप, बाबासाहेब ओव्हाळ,नाना धिरे (शहराध्यक्ष),बळीराम हिरे, राजाभाऊ खांडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड