August 9, 2025

बातमीदारांनी वास्तविकेतेचे भान ठेवावे – मुस्तफा खोंदे

  • कळंब – पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी सध्या वर्तमानपत्रापेक्षा सामाजिक माध्यमावर जास्त भर असल्यामुळे बातमीदारांनी वास्तविकेतेचे भान ठेवून वार्तांकन करावे असे आवाहन नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी केले.
    व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांना फराळाचे आयोजन दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तालुका कार्यकारिणीच्या तालुका उपाध्यक्ष पदावर राजेंद्र बारगुले,महेश फाटक, तालुका कार्याध्यक्ष जयनारायण दरक,तालुका सचिव कुंदन कांबळे,तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी परमेश्वर खडबडे व अकीब पटेल यांना डिजीटल विंगचे जिल्हा कार्याध्यक्ष पदाचे मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रके देवून सत्कार करण्यात आला.

  • या कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मिडीयाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा शिक्षण विभाग प्रमुख चेतन कात्रे,महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य सयाजी शेळके,धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख,दै.धाराशिव नामाचे संपादक विनोद बाकले यांनी भाषणातून पत्रकारांची सध्याची परिस्थिती विशद करून मार्गदर्शन केले.
    या कार्यक्रमात मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,चर्मकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कदम,कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे,सा.राजकीय कट्टा संपादक प्रा.सतिश मातने,साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते,तालुकाध्यक्ष प्रा.अविनाश घोडके,व्हॉईस ऑफ मीडिया उपतालुकाध्यक्ष रामराजे जगताप,तालुका कार्याध्यक्ष रामरतन कांबळे,सचिव महेश मिटकरी,तालुका प्रसिद्धी प्रमुख दिपक माळी,अविनाश सावंत,खातीब दादा,सिंकदर पठाण,शिवप्रसाद बियाणी,शीतल धोंगडे,आश्रूबा कोठावळे आदी पदाधिकारी व असंख्य प्रतिनिधींची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष श्रीकांत मडके यांनी तर आभार अकीब पटेल यांनी मानले.
error: Content is protected !!