धाराशिव (जिमाका)- शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ या कालावधीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवरील अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असून त्यासाठी दिलेली Re-apply ची मुदत संपली आहे. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण व परीक्षा शुल्क परतावा, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना निर्वाह भत्ता यांसारख्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ महाडीबीटी प्रणालीद्वारे मिळतो.मात्र Re-apply मुदत संपल्यानंतरही अनेक अर्ज विद्यार्थीस्तरावर प्रलंबित राहिल्याचे समाज कल्याण आयुक्तालय,पुणे यांच्या निदर्शनास आले आहे. या अर्जांचे परीक्षण करून त्यांना मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठीची सुविधा महाविद्यालय लॉगिनमध्ये Scrutiny या पर्यायामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.सदर प्रलंबित अर्ज २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत निकाली काढणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विहीत मुदतीत अर्ज निकाली न काढल्याने एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर राहील, असा इशारा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी दिला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान