February 9, 2026

विद्याभवन हायस्कूल,कळंबच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंबच्या संघाची नांदेड येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
    त्यानिमित्त प्रशालेच्या वतीने यशवंत ,गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही जी ,प्रमुख पाहुणे डॉ.अशोकराव मोहेकर सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा,उपमुख्याध्यापक मयाचारी विक्रम ,पर्यवेक्षक श्रीमती कोळी जे एन, याप्रसंगी उपस्थित होते.गुणवंत,यशवंत खेळाडू सृष्टी इंगोले,प्राजक्ता कुंभार, नेहा माने, प्रणिता कदम ,सोनम पांचाळ ,ज्ञानेश्वरी यादव,श्रुती वाघमारे ,समीक्षा आवाड ,श्रावणी पवार, समीक्षा जाधव ,संस्कृती शिंदे, शिवांजली दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला तसेच बॅडमिंटन जिल्हास्तरावर निवड झालेले खेळाडू पार्थ भिसे, अनुज टिप्परसे,आयुष जाधव, तनवीर मोहिते, शिवराज डोंगरे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच जिल्हास्तर हॉलीबॉल स्पर्धेत निवड झालेले खेळाडू बिरसा उबाळे ,दिशांत जावळे ,रोहन शिनगारे ,सोहम तौर, संदेश पवार ,गौस शेख ,सोहम काळे, सिद्धार्थ शेंडगे ,गोपाळ हजगुडे, ओंकार गुजर ,तुषार कांबळे ,अजिंक्य गोरे यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार हार गुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल भामरे दर्शन जनार्धन या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विभाग स्तर ,जिल्हा स्तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक मडके संजय ,मडके सुरज यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.अशोकराव मोहेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना, खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले की खेळाडूंनी सांघिक भावना जोपासली पाहिजे .स्पर्धेच्या युगात खेळाचे महत्व या विषयी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सोपान पवार यांनी केले तर आभार सुशीलकुमार तीर्थकर यांनी मानले.

error: Content is protected !!