February 9, 2026

किशोरवयीन मुलींसाठी पोषण महोत्सव – सातेफळ येथे उत्साहात कार्यक्रम

  • कळंब – वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, कळंब यांच्या वतीने “ग्रामीण समुदाय समग्र विकास” कार्यक्रमांतर्गत पोषण माह साजरा करण्याच्या निमित्ताने दि. १० सप्टेंबर २०२५, बुधवार रोजी सातेफळ येथे “किशोरवयीन/ मुलींचे प्रशिक्षण” हा उपक्रम पार पडला.
  • या प्रशिक्षण शिबिरात पोषण आणि आहार, एच.पी. कॅम्प, मासिक पाळीतील काळजी, सॅनिटरी पॅडचा वापर व आर्थिक बचत तसेच ॲनिमियाची कारणे, लक्षणे व उपचार यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन वॉटर ऑफिस कळंब येथील प्रियदर्शनी कांबळे यांनी केले .
  • कार्यक्रमातील विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व किशोरवयीन मुलींनी स्वतः पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. त्यामध्ये –
    गुळ-शेंगदाण्याचे लाडू, इडली-सांबर, शेवग्याच्या पानांचे थालीपीठ, मेथीची भाजी, शिमला मिरचीची भाजी,आळूच्या पानांच्या वड्या, तांदळाची खिचडी, खोबऱ्याचे लाडू, तुपातील रव्याचा शिरा, खोबऱ्याच्या वड्या, मटकीची भाजी,ढोकळा,पात्रीची भाजी, टोमॅटो चटणी, मसूर डाळीचे वरण, दही अशा विविध पदार्थांचा समावेश होता.

  • यावेळी मुलींना आहारातून मिळणारी जीवनसत्त्वे,संतुलित पोषणाचे महत्त्व,मासिक पाळीतील वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य व पोषणाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सॅनिटरी पॅडचा योग्य वापर व त्यातून होणारी आर्थिक बचत याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
    या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील महिला शिक्षिका, महिला प्रवर्तक उर्मिला तवले, वॉटर ऑफिस कळंब येथील प्रियदर्शनी कांबळे यांच्यासह एकूण ४५ सहभागी उपस्थित होते.
error: Content is protected !!