February 9, 2026

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे ॲम्बुलन्स सेवेचा शुभारंभ

  • दिव्यांग सादेक शेख यांच्या हस्ते ॲम्बुलन्स चे लोकार्पण
  • कळंब – हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठान व लोकसहभागातून ॲम्बुलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे,या सेवेचे लोकार्पण दिव्यांग व्यक्ती सादेक शेख यांच्या हस्ते करण्यात आल्याने कार्यक्रमाला सामाजिक संवेदनशीलतेचा अनोखा ठसा उमटला.
    या लोकार्पण सोहळ्यास कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,शिवसेना नेते अजित पिंगळे,अमजद मुल्ला, प्रा.श्रीधर भवर,संजय मुंदडा, मुस्ताक कुरेशी,डॉ.शाह जाकिर हमीद,मुफ्ती फारूक,मुफ्ती हाजी पाशा,हाफिज आरेफ,हाफिज खालेद,हाफिज वसीम,मौलाना इन्नुस,मौलाना दिलशाद,शाह रफिक तांबोळी,मिनाज शेख, शिवसेना (UBT) कळंब तालुकाध्यक्ष सचिन काळे , रोहन पारख, महादेव महाराज अडसूळ,सुनील गायकवाड,अतुल कवडे, दत्ता तनपुरे, भैय्यासाहेब खंडागळे, किरण हौसलमल, अनिल हजारे, मंगेश अष्टेकर, बाळासाहेब कथले, रुकसाना बागवान, मोसिन मिर्झा, बालाजी गायकवाड, सतपाल बनसोडे, विकास कदम, सचिन शिनगारे जिव्हेश्वर कुचेकर, गणेश त्रिवेदी, प्रवीण झोरी, शहाजान शिकलकर,अनंत बोराडे,नानासाहेब धाकतोडे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती लावली.
    ही ॲम्बुलन्स सेवा पूर्णतः ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय दयावान प्रतिष्ठानने घेतल्यामुळे कळंब शहर तथा ग्रामीण भागातील रुग्णांना परवडणाऱ्या दरात तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
    मागील काही वर्षापासून दयावान प्रतिष्ठान नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांत आघाडीवर आहे. गतवर्षी प्रतिष्ठाने अनाथ मुलींसाठी फिक्स डिपॉझिट योजना राबविली होती या उपक्रमा अंतर्गत भागातील 16 मुलींना याचा लाभ मिळाला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे निमित्त साधून दयावान प्रतिष्ठान तर्फे शहरात 125 संविधान प्रतीचे वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने भीम जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता. तर कोरोना काळात गरजूंपर्यंत किराणा किट पोहोचवून मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.
    यावर्षी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीचे निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे रुग्णांना तातडीच्या आरोग्यसेवेचा दिलासा मिळणार असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळ मिळेल. आगामी काळात या सेवेचा अधिक विस्तार होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

  • या वेळी दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान भाई मुल्ला, उपाध्यक्ष इम्रान काझी,सचिव अभय गायकवाड, समीर सय्यद, मुबीन मनियार, अलीम दारूवाले, फरमान सय्यद, हुजेब बागवान, इरफान शेख, अक्षय सातव, शफिक शेख, कलीम शेख, नादेर शेख, सम्राट गायकवाड, सलमान शेख, नदीम शेख, अमर मुल्ला, मोसिन मुल्ला, अमर चाऊस, शौकत शेख, शिवा शिंगणापुरे, अफरोज सय्यद,अमन मोमीन, आदिल सय्यद, मुजाहिद मोमीन, नसीर शेख, रिजवान खान,सद्दाम शेख, मुशीर मणियार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!