March 26, 2026

सावित्रीबाई फुले विद्यालयात शिक्षक दिन साजरा

  • कळंब – शहरातील रणसम्राट क्रीडा मंडळ कळंब संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    संस्थेचे संचालक चेतन (काका) भवर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे, उप मुख्याध्यापक सोमनाथ सावंत, पर्यवेक्षक शंकर गोंदकर हे उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!