कळंब (विशाल पवार) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेत दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘ हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान’ हा संस्कारक्षम उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.कुंभार, उपमुख्याध्यापक व्ही.एस. मयाचारी,पर्यवेक्षक श्रीमती कोळी जे एन सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम पवार एस.जे यांनी या उपक्रमाबद्दल ची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली.सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेतील स्वच्छता,शिस्तबद्धता,शाळेतील हरितमय वातावरण,विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजविणे,राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता व नागरी कर्तव्यांचे पालन,शाळा म्हणजे राष्ट्रीय चारित्र निर्माण करण्याचे केंद्र,नैसर्गिक पर्यावरण व मूल्यांची जपणूक करणे असा सामूहिक संकल्प करण्यात आला. प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन