August 1, 2026

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांचा लसाकमतर्फे सत्कार

  • कळंब – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कळंब तालुका क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ (लसाकम) कळंब तालुका शाखेच्या वतीने बुधवार, दि.२७ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    या कार्यक्रमात सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांचा शाल, पुष्पहार, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सोमनाथ कदम (राज्य कार्याध्यक्ष, लसाकम कणकवली) होते. प्रमुख पाहुणे म्हणून नरसिंगजी घोडके (राज्य नियंत्रक,लसाकम लातूर) उपस्थित होते.तर प्रमुख वक्ते म्हणून पांडुरंग हिराबाई शंकर घोडके (राज्य पुरस्कार प्राप्त, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सारोळा, धाराशिव) यांनी मार्गदर्शन केले.
    यावेळी लोकविकास मंचचे विश्वनाथ (अण्णा) तोडकर, लसाकम कळंब तालुका अध्यक्ष दिलीप मोरे,सचिव प्रा.सोमनाथ कसबे,दत्ता गायकवाड,विक्रम भंडारे,बापू भंडारे,बाळासाहेब कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
    सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा क्रांतिकारक वारसा, सामाजिक विचार आणि समाजजागृतीची परंपरा यांचा गौरव करण्यात आला.
error: Content is protected !!