कळंब – एहसास फाउंडेशन कळंब व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था कळंब संचलित साक्षी कोचिंग क्लासेस येथे भव्य सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात सुफी सय्यद शमशोद्दीन यांना दिल्ली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार, डॉ.सौ.शैलजा बाबुराव कुचेकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नॅशनल एक्सेलेन्स अवॉर्ड, डॉ.सज्जन ज्ञानदेव गायकवाड यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सेलेन्स अवॉर्ड तसेच अनंत घोगरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसुळ,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष द.घोडके, उपसंपादक माधवसिंग राजपूत, एहसास फाऊंडेशनचे अध्यक्ष अमन शेख,प्रा.डॉ.सोमनाथ कसबे, प्रा.डॉ.महेश पवार,खापे अण्णा, आदिल सय्यद,वाजेद तांबोळी, अविनाश घोडके,आरपार तांबोळी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश घोडके यांनी केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी