कळंब – जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पत्र क्र.२०२५/महसुल/रवका/कावि दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ अन्वये कळविण्यात येते की,तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडीअडचणी त्वरित सोडविण्यासाठी तहसील कार्यालय कळंब येथे ‘जनता दरबार’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या अनुषंगाने,आठवड्यातील सोमवार,बुधवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांनी आपले प्रश्न,तक्रारी व मागण्या घेऊन या दरबारात सहभागी व्हावे व शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या सोयीचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी