March 26, 2026

शिराढोण येथे कॅन्सर तपासणी शिबिर;नागरिकांसाठी मोफत सुविधा

  • शिराढोण (परमेश्वर खडबडे) – शिराढोण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी कॅन्सर तपासणीसाठी विशेष वाहन येणार असून या वाहनातून नागरिकांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शनही मिळणार असल्याने गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
    या उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जहुर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीष कस्पटे, डॉ. अन्वर सय्यद आणि आरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
    आरोग्य केंद्र शिराढोण तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “कॅन्सरविरुद्ध वेळेत निदान करणे हाच सर्वोत्तम बचाव आहे. आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन निरोगी आयुष्याच्या दिशेने पाऊल टाका.”
error: Content is protected !!