February 8, 2026

विद्याभवन हायस्कूल कळंबच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथील विद्यार्थ्यांनी मंगरूळ येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
    १९ वर्षे वयोगटात कुमारी तेजस्वी माळी,१७ वर्षे वयोगटात प्रथमेश शिंदे,महेश पवार,प्रथमेश गायकवाड,तर १४ वर्षे वयोगटात श्रीराम यादव व संस्कार पुरी या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून सर्वांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
    या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार, उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी व पर्यवेक्षक सौ.कोळी यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
    विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना सचिव डॉ. अशोकराव मोहेकर तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.
    या विजयी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय मडके व सुरज मडके यांचे मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!