कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३- ८- २०२५ वार शनिवार रोजी या दिवशी ‘विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयात ध्वजावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष शाम (नाना) खबाले,सहसचिव प्रा.संजयजी घुले व प्राचार्य डॉ.हनुमंत माने या मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच अध्यक्ष शाम खबाले यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करून विद्यापीठ गिताने ध्वजमानवंदना देण्यात आली.यावेळी आयक्युएसी समन्वयक डॉ.अनिल जगताप,रासेयो विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड