March 26, 2026

प्रा.भास्कर चंदनशीव यांना जीवनसाधना पुरस्कार जाहीर

  • धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे जीवनसाधना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विद्यापीठ धाराशिव उपपरिसरचा पुरस्कार प्रख्यात ग्रामीण कथाकार प्रा.भास्कर चंदनशिव यांना वर्धापनदिनी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना दरवर्षी वर्धापनदिनी जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात येते.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी यंदाची पुरस्कार शोध समिती स्थापन केली. सदर प्रक्रिया अत्यंत गोपनीय व पारदर्शक रितीने राबविण्यात आली.या समितीने ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ,कृषीरत्न विजयअण्णा बोराडे यांची जीवनसाधना पुरस्कारासाठी शिफारस केली. विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापनदिनी ’एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
error: Content is protected !!