आत्मक्लेश करणारी व्यक्ती क्रांतिकारक अशी व्यक्ती असते. क्रांतिकारक हा शब्द विशेषण म्हणून वापरला जाऊ शकतो; समाजावर किंवा मानवाच्या काही पैलूंवर मोठा प्रभाव पडतो, कारण त्याला सर्वस्वी ठरविले जाते. ‘क्रांतीकारी’ याचा अर्थ असा क्रांतिकारी आहे जो एखाद्या व्यवस्थेविरुद्ध बंड करतो किंवा अन्याय, हिंसा किंवा काहीतरी चुकीचे आणि अस्वीकार्य अशा निर्णयाविरुद्ध बंड करतो. क्रांतीकारी ही अशी व्यक्ती आहे जी एकतर विद्रोह करते किंवा सद्य परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी त्याचे समर्थन करते. या ऐतिहासिक ‘चले जाव’ आंदोलनात 8 ऑगस्ट रोजी गोवालिया टँक मैदानावर ‘वंदे मातरम्’ हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांनी झिंझोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले. यावेळी पेटून उठलेल्या भव्य जनसमुदयासमोर हे तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तर कृष्णरावांचीच निवड करण्यात आली होती. या गीतावर इंग्रजांनी बंदी घातलेली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या गीताचे संपूर्ण कडव्यांसहित जाहीर गायन करणे हे फार मोठे धाडस होते. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात 9 लाख लोकांनी स्वतःला अटक करवून घेतली. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट ॲटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च 1947 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट ॲटली याने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. मेजर ॲटली यांच्या घोषणेनुसार 24 मार्च 1947 रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय. भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट 1942 मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन “चले जाव चळवळ” होते. गांधीजींच्या करा किंवा मरा ह्या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती. मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले होते. महात्मा गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाचा एक भाग म्हणून अटक करण्यात आली होती. या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे 9 जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला होता आणि 15 जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली आणि 9 जुलै 2018 रोजी चले जाव चळवळीचा 75 वा वर्धापन दिन संपन्न झाला. 1942 साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना “चले जाव”चा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. ह्या आन्दोलनाचे प्रतिसाद शहरी भागासह ग्रामीण भागातही पसरले. तत्कालीन ग्रामीण भागातील अग्रनी कार्यकर्ते असणारे बुलडाणा जिल्ह्यातील, नागझरी गावचे रखमाजी कायंदे (सावकार) यांनी शेकडो कार्यकर्ते आपल्या स्वखर्चाने मुंबईला आंदोलनात सहभागी केले होते. सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर 24 मार्च 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. 3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा स्वतंत्र झाला. भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन या नावाने साजरा केला जातो. भारत छोडो आंदोलन ही भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील एक महत्त्वाची घटना आहे आणि दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलन दिन म्हणून पण साजरा केला जातो. हा दिवस 1942 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटीश राजवटीच्या विरोधात जन आंदोलन सुरू केला होता.आजदिनी 83 व्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शुभेच्छा !
More Stories
विद्यार्थ्यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे – सरन्यायाधिश न्यायमूर्ती भूषण गवई
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर – अण्णाभाऊ साठे