कळंब – लसाकम शाखा कळंबच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त, दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजिण्यात येत आहे.हा कार्यक्रम दि.२७ ऑगस्ट २०२५, बुधवार रोजी संपन्न होणार असून,मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात इ.१०वी, १२वी,पदवी,पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन किमान ६०% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी खालील संपर्क क्रमांकांवर करावी. 📞 शामराव ससाणे – 83295 28827,📞 सोमनाथ कसबे – 86238 92881,📞 दिलीप मोरे – 90756 17242,बाळासाहेब कांबळे – 98238 39719 या गौरव सोहळ्यातून समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व इतर तरुणांमध्ये शैक्षणिक जागृती व्हावी,हा प्रमुख उद्देश आहे. लसाकम शाखा,कळंबमार्फत होत असलेला हा उपक्रम समाजहितासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर