August 8, 2025

संत ज्ञानेश्वर मुकबधिर विद्यालयातील मुलींनी बनवल्या बियांपासून सुबक राख्या

  • कळंब – श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमा सण जवळ आल्याने मुकबधिर मुलींनी पर्यावरण पूरक राख्या बनवण्यासाठी सुरुवात केली. तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव ता. कळंब संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय ता.कळंब जि. धाराशिव येथील चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण प्रेम व स्वालंबनाचे मूल्य रूजवण्यासाठी व त्यांच्यातील सृजनशीलता, कल्पतेला चालना मिळावी यासाठी राख्या बनवण्याचा उपक्रम शाळेमध्ये घेण्यात आला. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने मुलींना विविध प्रकारच्या राख्या बनवण्यास मुकबधिर मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले व त्यांनी आपल्या मूकबधिर भावांसाठी सुंदर अशा बियांपासून व विविध प्रकारच्या राख्या बनवलेल्या आहेत. बियांपासून राखी बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हातात बांधलेल्या राखीतील बिया इतरत्र पडून त्या ठिकाणी नवीन वृक्ष निर्माण व्हावे व वृक्ष लागवड व्हावी. यासाठी बियांपासून राख्या निर्माण केलेल्या आहेत.
    भावा बहिणीचं प्रेमाचं नातं कायम राहावं यासाठी मुकबधिर मुलींनी स्वतःच्या हाताने विविध प्रकारच्या राख्या साकारल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे विविध उपक्रम शाळा नेहमी घेत असते.
    रेशमाची राखी भावाच्या हातात बांधण्यासाठी स्वतःची कलाकुसर वापरून रक्षाबंधनासाठी सुंदर अशा विविध डिझाईनच्या मोत्यापासून, बियांपासून, मातीपासून तसेच अनेक प्रकारच्या राख्या त्यांनी बनवलेले आहेत.
    या राख्यांसाठी परिसरातील नागरिकांचा प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद मिळत असतो. याचाच विचार करून याही वर्षी ज्या मुलींना ऐकता येत नाही व बोलता येत नाही अशा कर्णबधिर मुलींनी आपल्या परिसरातील भावांसाठी सुबक राख्या बनवलेल्या आहेत. यातून मुलांना स्वतःचा पूरक व्यवसाय करता यावा व आर्थिक व्यवहार त्यांना कळवा यासाठी असे उपक्रम तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधिर विद्यालयात असे प्रत्येक सणाला नवनवीन उपक्रम सतत सुरू असतात. त्यातीलच एक भाग म्हणून राखी पौर्णिमेनिमित्त सर्व आपल्या भावांना बांधण्यासाठी खूप छान अशा राख्या मुलींनी बनवलेले आहेत.
    या राख्या बनवण्यासाठी मूकबधिर शाळेतील विशेष शिक्षिका सुनंदा गायकवाड व सुनिता गुंड यांनी या मुलींना मार्गदर्शन केलेले व त्यांच्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे काम शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवरयांनी केलेले आहे. शाळेतील सर्व मुलींनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला.
error: Content is protected !!