कळंब -“माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा २०२५” अंतर्गत राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य राज्यस्तरीय सत्कार सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव लकडे (तालुका अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट, कळंब) होते. प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर पालकर (पुढारी प्रतिनिधी), शिराज पठाण (पीएसआय, कळंब), विठ्ठल माने (संचालक, स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शन), आणि अप्पासाहेब शेळके (जिल्हा प्रतिनिधी, एबीपी माझा) यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गपाट यांनी प्रभावीपणे केले. या सोहळ्यात “२०२५ बेस्ट टीचर पुरस्कार” खालील शिक्षकांना प्रदान करण्यात आला: गायकवाड शोभा तुकाराम – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी (के),शिंदे राजेभाऊ विष्णू – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अंजली महादेव यादव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव पुढीलप्रमाणे करण्यात आला: राज्यस्तर प्रथम क्रमांक – टॅब, गोल्ड मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र, विभागीय स्तर – ₹१००१ शिष्यवृत्ती, ट्रॉफी, स्कूल बॅग, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र,जिल्हास्तर – ₹५०१, ट्रॉफी, स्कूल बॅग,गोल्ड मेडल व प्रमाणपत्र,तालुकास्तर – ₹२०१,स्कूल बॅग,ट्रॉफी, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र,केंद्रस्तर प्रथम क्रमांक – स्कूल बॅग, ट्रॉफी, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र,केंद्रस्तर २ ते ६ क्रमांक – गोल्ड मेडल व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास,त्यांच्या यशाचा आनंद आणि उपस्थित मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे या सोहळ्याला संस्मरणीय बनवणारी ठरली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पालक,शिक्षक,अधिकारी आणि मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले