धाराशिव (जिमाका) – इतर मागास प्रवर्ग (ओबीसी),विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेताना वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.धाराशिव जिल्ह्यात मुला-मुलींसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले असून,या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. संबंधित विद्यार्थी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतील.अर्जाची प्रक्रिया खालील वेळापत्रकानुसार असेल: अर्ज करण्याचा कालावधी: १ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ अर्ज छाननी कालावधी:१८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२५ पहिली निवड यादी जाहीर व प्रवेश अंतिम मुदत २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५,रिक्त जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी प्रवेश अंतिम मुदत : ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५ असा आहे. या योजनेत बीए,बीकॉम,बीएससी पदवी अभ्यासक्रम तसेच एमए, एमएससी सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश दिला जाणार आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उच्च शिक्षणासाठी सुविधा मिळवावी,असे आवाहन श्री.अमोल ताकभाते, सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला