August 8, 2025

ज्ञान प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये नवीन नियुक्ती व बदलीबाबत सत्कार समारंभ

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे सतीश कानगुडे हे पर्यवेक्षक पदावर रुजू झाल्याबद्दल त्यांचा मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
    तसेच या प्रसंगी क्रिडा शिक्षक संजय मडके यांची बदली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे झाल्याने,त्यांच्या गौरवासाठी उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला.कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • दरम्यान,ज्ञान प्रसार विद्यालय,मोहा येथेही सतीश कानगुडे यांचा पर्यवेक्षकपदावर नियुक्तीबद्दल संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा) पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.याच वेळी क्रिडा विभागाचे शिक्षक संजय मडके यांची बदली झाल्यामुळे सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांच्या हस्ते त्यांना निरोप देण्यात आला.
  • कार्यक्रमास सहशिक्षक चिलवंत राजाभाऊ,अमरसिंह पाटील, धनंजय परजणे,श्रीमती पांचाळ उषा आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!