येरमाळा – दि.१ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित ज्ञानोद्योग विद्यालयात साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी डॉ.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण ज्येष्ठ शिक्षक दिलीप मोरे व ओमप्रकाश बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिनानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या – इ.५ वी ते ७ वी – लहान गट,इ.८ वी ते १० वी – मोठा गट प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांकाचे विजेते निवडून जाहीर करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग व सहकार्य दिले.
More Stories
ज्ञानोद्योग विद्यालयात ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा!
स्त्री शिक्षणाच्या जननींना अभिवादन;ज्ञानोद्योग विद्यालयात जयंतीनिमित्त सांस्कृतिक उपक्रम संपन्न
येरमाळ्यात लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी