कळंब – लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा भावी संस्था,गौर ता.कळंब यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष हनुमंत तौर हे होते. यावेळी येरमाळा पोलीस स्टेशनचे बीट जमादार मुंडे, ग्रामपंचायत गौरचे सरपंच धनाजी देशमुख,पंचायत समिती सदस्य माने,तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती देशमुख,विकास सोनवणे, भागवत तौर,सचिन तौर,केशव तौर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात मातंग समाजातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम होते.त्यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून शोषित,पीडित समाजाच्या व्यथा जगासमोर मांडल्या.” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन