धाराशिव – दि. ३० जुलै २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी, जिल्हा धाराशिवच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाचे दुःख व वेदना प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या “फकीरा” सारख्या साहित्यकृतींतून अन्यायाविरुद्ध लढणारा सामान्य माणूस जनतेसमोर आला.लोककथा, पोवाडे,तमाशा यांसारख्या लोककलांच्या माध्यमातून त्यांनी समाजात प्रबोधनाचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात त्यांच्या पोवाड्यांनी नवचैतन्य निर्माण केले. या महान विचारवंताच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे, जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष शितल चव्हाण, जिल्हा संघटक काशिनाथ (बाबा) वाघमारे, जिल्हा सहसचिव सोमनाथ नागटिळक, प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे, उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मण खुणे, कार्यकारिणी सदस्य युनुस पटेल, माजी महिला जिल्हाध्यक्षा ॲड. झीनत प्रधान,ॲड.निलेश प्रधान, पांडुरंग सरवदे,उमेश भालेराव, रघुनाथ गायकवाड,तसेच युवक आघाडीचे पदाधिकारी मनीष कांबळे,मिलिंद खुणे,कळंब तालुका महासचिव मोहन वाघमारे, धाराशिव तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम,जिल्हा प्रवक्ता बाळासाहेब कदम,हिमेश खुणे, सोमनाथ पेठे,मनोज चांदणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार होऊन वंचित समाजासाठी प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य