कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.२३ जुलै २०२५ रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रा.सुकेशनी गव्हाणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,दीक्षा गायकवाड,विनोद कसबे तसेच भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापक व कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी