August 9, 2025

कळंब – वाशी येथे वृक्ष लागवडी मोहिमेस स्वयं शिक्षण प्रयोगचा प्रतिसाद

  • कळंब – धाराशिव एक हरित अभियान या अंतर्गत कळंब व वाशी तालुक्यात मिळून एकूण 63 गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.यामध्ये स्वयं शिक्षण प्रयोगच्या माध्यमातून व डब्ल्यू सी आर एफ प्रकल्पाच्या माध्यमाने
    Vag लीडर शेतकरी महिला ब्लॉक लीडर यांनी या मोहिमेस प्रतिसाद दिला.
    ” एक पेड ! मा के नाम ” धाराशिव हरित अभियान या अभियानामुळे धाराशिव जिल्ह्यात दिनांक 19 जुलै 2025 रोजी सोनेरी पहाट घेऊन दिवस उजडला.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जिलाधिकारी,तालुका अधिकारी, कृषि अधिकारी,तलाठी,ग्राम सेवक,शिक्षक,आंगनवाड़ी ताई, आशा कार्यकर्ती,मदतनीस, सरपंच,उप सरपंच,सीआरपी ताई, कृषि सखी,बचत गटाचे अध्यक्ष सचिव,शालेय विद्यार्थी,स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या समन्वयक जयश्री काळे,विजयमाला शेंडगे WCRF प्रकल्पातील लिडर,VAG लीडर व शेतकरी महिला,इतर पुरुष मंडळी यांच्या सर्वांच्या सहभागातून,सहकार्याने व मदतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.पूर्ण जिल्हात 15 लाख झाडे लावण्यात आली आहेत या वर्षी त्या झाडांना बार कोड बसविण्यात आले आहेत. वृक्षारोपण केलेल्या
    झाडामधे आंबा,पेरु ,सिताफळ, चिंच ,तरवट ,करंजी,वड,चिकु ,जांभुळ, इत्यादि झाडांचा समावेश आहे वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी लोकेशन चालु होते. झाडाला पाण्याची सोय केली होती. ” झाडे लावा झाडे जगवा ” ही घोषणा देऊन झाड़े लावण्यास चालु केले होते.हरित जिला म्हणून धाराशिव चे नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले आहे ,झाडाचे महत्व सांगणे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थाच्या मुल्यांत व उद्देशात मोडते.
error: Content is protected !!