कन्नड – पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे.लवकरच चंद्रहार ढोकणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुत्रे हाती घेणार आहे. प्रशासकीय अधिकारी जनतेचा विश्वस्त व शासन जनतेचा दुवा असल्यामुळे जनतेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून काही आशा असतात जे चंद्रहार ढोकणे यांनी अत्यंत अल्पकाळात आपल्या कुशल कार्याने पूर्ण करून जनतेचे कामे करून पंचायत समितीचे कर्तबगार गटविकास अधिकारी म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे.त्यांनी शेतकऱ्यांसाठी व सामान्य जनतेच्या साठी शासन योजना राबवून कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांना विहीरी,गायगोठे,वृक्ष लागवड,शिक्षण,सिंचन,घरकुले या योजना ठप्प झाल्या होत्या.पण चंद्रहार ढोकणे कन्नड पंचायत समितीची गटविकास अधिकारी म्हणून रुजू पदभार स्वीकारल्या नंतर योजना राबवून घेवून सामान्य जनतेला लाभ मिळवून दिला अनेक शेतकऱ्यांना विहिरी दिल्या, बेघर गरीब कुटुंबाला राहण्यासाठी घरकुल दिले.शेतकऱ्याच्या गुरांसाठी शासनाची गायगोठा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.अश्या प्रकारे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्या कुशल कार्य लक्षात घेवून शासनाने त्यांची संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली केली आहे चंद्रहार ढोकणे यांनी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड