August 9, 2025

ज्ञानोद्योग विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

  • येरमाळा – साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोद्योग विद्यालय,येरमाळा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पणाने झाली,ही विधी प्राचार्य पाटील यांच्या हस्ते पार पडली.या वेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली व त्यांचं प्रेरणादायी कार्य उलगडलं.
    विशेष म्हणजे,इ.५ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ.अमर बारकुल यांनी केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख डी. बी.मोरे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर आधारित कविता वाचून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तसेच कार्यक्रमाचे सुसंगत सूत्रसंचालनही केले.
    प्राचार्य सुनिल पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. अण्णाभाऊंच्या कथाकादंबऱ्यांचा गौरव करत त्यांना साहित्यसम्राट व साहित्यरत्न अशा शब्दांत मानवंदना दिली.
    कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती सिना सिरसट यांनी मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले.
    कार्यक्रमाला सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!