February 9, 2026

अमेरिका यात्री मोहेकर दांपत्याचा सहृदयी सत्कार

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून प्रकाशित होत असलेले सा.साक्षी पावनज्योत या साप्ताहिकाचे मार्गदर्शक,तसेच ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर व संचालिका प्रा.अंजली मोहेकर हे अमेरिका येथील शैक्षणिक दौऱ्यावरून नुकतेच परतल्यानंतर शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे त्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.

  • या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीत मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,अलकाताई मोहेकर हे होते.त्यांच्या हस्ते डॉ.अशोकराव मोहेकर आणि प्रा.अंजली मोहेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

  • याप्रसंगी संचालक प्रा.वसंत मडके,संचालक डॉ.संजय कांबळे,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,श्री माधवराव भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अजित साळवे,विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुभाष लाटे,अंगद मिटकरी,दत्तात्रय वळेकर,मराठवाड्यातील ज्ञान प्रसारक मंडळ संचलित सर्व विद्यालये व महाविद्यालयांचे प्राचार्य,मुख्याध्यापक,प्राध्यापक,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • उपस्थित मान्यवरांनी मोहेकर दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याची आणि जागतिक पातळीवरील योगदानाची स्तुती करत,त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    या सत्कार समारंभातून शिक्षणमहर्षींच्या दूरदृष्टीचा, जागतिक पातळीवर भारतीय शिक्षणपद्धतीचा अभिमानाने प्रसार करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला.
error: Content is protected !!