February 8, 2026

सभापती शिवाजी कापसे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

  • कळंब – कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.११ जुलै २०२५ रोजी शहरातील अनेक भागात सर्वरोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाते. सर्वरोग निदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.रक्तदान शिबिराचे उद्घाटन साई साखरचे संचालक पांडुरंग आवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी उपसभापती प्रा.श्रीधर भवर,शिवसेना नेते अजित पिंगळे, उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते आदी हजर होते.या शिबिरात शुगर,रक्त आदी तपासणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी बाजार समितीमध्ये अनाथ आश्रम शाळेला एक महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले.याशिवाय गोशाळेतील पशुधनांसाठी खाद्य देण्यात आले.यावेळी बाजार समितीचे उपसभापती प्रा.श्रीधर भवर,डॉ.ऋषीकेश भवर, शिवसेनेचे नेते अजित पिंगळे, माजी नगरसेवक सतीश टोणगे, मुस्ताक कुरेशी,शशिकांत फाटक,अभय देवडा,एजाज शेख, अतुल कवडे,रोहन पारख,लक्ष्मण कोल्हे,प्रा.तुषार वाघमारे,सुरेश शिंदे,ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,बाजार समितीचे सर्व संचालक,व्यापारी, शेतकरी,माजी नगरसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हनुमंत माने यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त सर्वरोगनिदान शिबिर तर इंदिरा नगरमध्ये डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले.

 

error: Content is protected !!