August 9, 2025

कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी सोहळा उत्साहात

  • कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल कळंब येथे दि.४ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त ‘बालदिंडी’ सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली.याप्रसंगी शाळेचे संस्थापक रवि नरहिरे,उपाध्यक्षा सौ.आशा नरहिरे,व्हाइस प्रिन्सिपल पवनकुमार कुलकर्णी,पालक प्रतिनिधी संदीप ठोंबरे व संस्थेचे सचिव प्रणव नरहिरे यांची उपस्थिती लाभली होती.
    नर्सरी,ज्युनिअर व सीनिअर के.जी.च्या चिमुकल्यांनी नयनरम्य नृत्य सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी संत गोरोबा काकांच्या जीवनावर आधारित बहारदार नाटिकेद्वारे संत परंपरेचे दर्शन घडवले.विठू-माऊलीच्या नामघोषाच्या गजरात संपूर्ण शाळाभोवती आनंदात बालदिंडी काढण्यात आली.टाळ-मृदंगाच्या तालावर सर्व शिक्षक-शिक्षिकांनी सामूहिक भजन गात वातावरण भक्तिमय केले.
    कार्यक्रमाची सांगता चिमुकल्यांच्या रंगतदार रिंगण सोहळ्याने झाली. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे कार्यकारी प्रमुख,सर्व शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!