June 19, 2025

वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार

  • निलंगा (माधवसिंग राजपूत) – शेत ताब्यात घेऊन
    मुलांनी बेदखल केलेल्या वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या वतीने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचा बुधवार दि 18जून 2025 रोजी उपविभागीय कार्यालय निलंगा येथे फेसकॉम तर्फे सत्कार करण्यात आला.
    याबाबत चे सविस्तर वृत्त असे की,निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील शेतकऱ्यांची स्वतःच्या मुलांनी जमीन ताब्यात घेऊन वडिलांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे मला न्याय मिळावा या मागणीसाठी वृद्ध शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्याकडे तक्रार केली. या वृध्द शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करत प्रत्यक्ष गावात जाऊन
    वृद्ध माता-पिता अधिनियम 2007 अन्वये वृध्द
    शेतकऱ्याला न्याय दिला.शेडोळ येथील माधव गणपती धुमाळ वय 78 वर्ष या शेतकऱ्याकडे परंपरागत ९२ आर जमीन होती. कालांतराने वाटणी करत यातील मोठा मुलगा रमेश माधव धुमाळ यांना २६ आर व छोटा मुलगा गणपत महादेव धुमाळ याला 26 आर जमीन वाटणी मध्ये दिली व स्वतःकडे ४० आर जमीन ठेवून घेतली. कालांतराने स्वतःला शेती होत नाही म्हणून ती 40 आर जमीन मोठा मुलगा रमेश माधव यांना करून खाण्यास दिली. यातील झालेल्या उत्पन्नापैकी अर्धे उत्पन्न रोख रक्कम द्यावी व वर्षभर खाऊ घालणे सांभाळ करावा असे ठरले. मात्र शेतीमध्ये नापीक झाल्यामुळे व पाण्याची कमतरता असल्यामुळे खरीप व रब्बीचे काहीच उत्पन्न मिळाले नसून शेती नुकसानीत असल्याचा खुलासा रमेश धुमाळ यांनी केला व वडिलांना वरील बोलल्याप्रमाणे काहीही देऊ शकला नसल्याने वडील माधव धुमाळ यांनी उपविभागीय कार्यालय येथे तक्रार दाखल केली. यावर तात्काळ अंमलबजावणी करत निलंगा येथून उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी शेडोळ गावात जाऊन ग्रामस्थ व पंचा
    समक्ष जवाब घेऊन पंचनामा केला व शेतकरी माधव धुमाळ यांच्या मर्जीने स्वतःच्या मालकीची ४० आर जमीन लहान मुलगा गणपत माधव धुमाळ यांच्या ताब्यात देऊन यातील काही रोख रक्कम खर्चण्यासाठी,औषध उपचार,जेवू घालावे व सांभाळ करावा असा न्याय दिला .
    उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी शासनाच्या वृद्ध माता-पिता अधिनियम 2007 अन्वये वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संपर्क सचिव डॉ बी आर पाटील, फेस्कामचे वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्राचे समिती प्रमुख प्रभाकर कापसे,दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागीय अध्यक्ष डॉ. दामोदर थोरात,लातूरचे प्रकाश निला,धोंडीराम मिरगाळे,विभागीय सहसचिव हरिश्चंद्र राठोड,शिवाजी मुगळे,दिलीप धुमाळ,स्वरूप पाटील,धनाजी माने सुभाष माने आदींनी निलंगा येथे येऊन उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचा सत्कार केला.
error: Content is protected !!