June 19, 2025

नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाजाविषयीची कळंब येथील शाळापूर्व तयारी आढावा बैठक

  • कळंब – येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय मध्ये खाजगी अनुदानित,अंशतः अनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व शाळा व कनिष्ठमहाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ यासाठी शाळा पूर्व तयारी आढावा बैठक मोठ्या उत्साहात झाली.या बैठकीमध्ये वाशी व कळंबतालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यांना धाराशिव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक
    विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंखे,उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,विस्तार अधिकारी संतोष माळी,कळंब चे गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांनी मार्गदर्शन केले. व मुख्याध्यापकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे व अडचणीचे निरासन केले.बैठकीसाठी अनुपस्थित मुख्याध्यापकानां नोटीस काढण्यास सांगितले. व अनुपस्थित मुख्याध्यापक कशामुळे गैरहजर आहेत याची माहिती घेतली.या बैठकीमध्ये नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी प्रवेश,शाळा प्रवेशोत्सव,आधार नोंदणी,अपार नोंदणी, संच मान्यता,समायोजन,अकरावी ऑनलाइन प्रवेश,सर्व विद्यार्थी लाभांच्या योजना,सर्व शिष्यवृत्ती योजना, वृक्ष लागवड,यु-डायस या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत भगवान,उपप्राचार्य आप्पासाहेब मिटकरी,विस्तार अधिकारी सुशील फुलारी,विलास अडसूळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक काकासाहेब मुंडे यांनी केले. तर आभार धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे यांनी मानले.यावेळी वाशी व कळंब तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित
    होते.
error: Content is protected !!