August 9, 2025

एनव्हीपी शुगरमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात बील जमा

  • धाराशिव- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि.मार्फत गळीत हंगाम 2023-24 मध्ये दि.21/102023 ते 31/10/2023 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे राहिलेले फरक बिल रू.100/- आणि दि.01 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे 2800/- प्रमाणे बिल बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.
    शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून पंधरवाडी बिल काढताना प्रोसिजरला विलंब नलावता दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांचे बील जमा केलेले आहे. तरी शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे.असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
error: Content is protected !!