June 19, 2025

अनुसूचित जाती-जमातींच्या अडचणींवर त्वरित कार्यवाही करा – लोक जनशक्ती पार्टीची मुख्यमंत्र्यांना मागणी

  • कळंब – महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनुसूचित जाती आणि जमातींना त्वरित मिळावा,तसेच अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात,यासाठी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या वतीने मुख्यमंत्री यांना दि.६ जून २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी (कळंब) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
    या निवेदनात पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या – १) जात प्रमाणपत्र बाबत होणारा अन्याय:जात प्रमाणपत्रासाठी सादर कराव्या लागणाऱ्या पुराव्यांबाबत धाराशिव जिल्ह्यात अनावश्यक अडचणी निर्माण होत असून,त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावीत.२) महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना त्वरित मंजूर करून लाभार्थ्यांना मदत करण्यात यावी.३) समाजकल्याण निधी कोणत्याही इतर योजनेत वापरण्यात येऊ नये.
    ४) आपले सरकार सेवा केंद्रे, जी ग्रामपंचायतीमार्फत सुरू होती, ती पूर्ववत कार्यान्वित करावीत.
    ५) शेतकरी कर्जमाफी लवकरात लवकर लागू करावी.
    ६) शेतकऱ्यांचे विमा अनुदान थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तसेच, बी-बियाणे आणि शेतीसाठी आवश्यक औजारांचे वितरण करावे,७) पीएमईजीपी व सीएमईजीपी योजनांचे कर्जप्रकरणे माफ करण्यात यावीत.८) श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना मागील ५-६ महिन्यांपासून थांबलेले मानधन तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावे.९) पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही. त्यांना तातडीने लाभ मिळावा.
    या निवेदनात असा इशारा देण्यात आला आहे की,जर वरील मागण्यांवर शासनाने तत्काळ कार्यवाही केली नाही, तर माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती मागवून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
    या निवेदनावर राजाभाऊ गायकवाड (जिल्हाध्यक्ष, लोजपा धाराशिव), महावीर गायकवाड (जिल्हा कार्याध्यक्ष, आरपीआय – खरात गट),निवृत्ती हौसलमल (जिल्हा निरीक्षक,आरपीआय – खरात गट) तसेच मुकेश गायकवाड,दीपक हौसलमल, लिंबराज चंदनशिवे,विशाल शिंदे, नागेश धिरे,राहुल बनसोडे,गौतम हजारे,नटराज गायकवाड,भारत कदम,श्रीकांत हुलसुरकर,प्रकाश धावारे,अल्का धर्मराज ताटे, साखरबाई डिकुळे,छायाबाई कसबे,सोजरबाई चंदनशिवे,आल्काबाई हौसलमल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!