March 26, 2026

पर्यावरण दिनानिमित्त माफसूच्या संचालनालय विस्तार शिक्षण येथे वृक्षारोपण

  • नागपूर (प्रवीण बागडे) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपुर च्या संचालनालय,विस्तार शिक्षण आणि शेतकरी भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.सर्वत्र मोठया प्रमाणावर वृक्षतोड होत असुन त्याचा परिणाम तापमानावर दिसुन येत आहे.
    या वर्षी तापमान हे 45 ते 47 अंशावर गेले असुन या पुढे तापमानात दिवसेंदिवस वाढ होणार आहे. ‘झाडे लावा,झाडे वाचवा’ ही काळाची गरज आहे, म्हणुन वेळीच वृक्ष लागवडीचे महत्व समजून घेऊन मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करुन संवर्धन करणे गरजेचे आहे.
    या प्रसंगी संचालक,विस्तार शिक्षण डॉ.अनिल भिकाने, तांत्रीक अधिकारी डॉ.सारीपुत लांडगे,कास्ट्राईब महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे (नागपूर शाखा) उपाध्यक्ष प्रवीण बागडे,सचिव जितेंद्र हातमोडे,मोहन कापसे, अतुल जाधव,राजेश गहलोद आणि स्वप्नील दाते ई.प्रामुख्याने उपस्थित होते.
error: Content is protected !!