मुंबई – महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जमिनीच्या हिस्से वाटपासाठीची मोजणी फक्त 200 रुपयांमध्ये केली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता शेतीसंबंधित जमिनीच्या मोजणीसाठी मोठा खर्च करावा लागणार नाही.एकत्र कुटुंबाच्या जमिनींची नोंदणीकृत वाटणी पत्रे व अधिकृत नकाशे मिळवणे आता अधिक सुलभ आणि स्वस्त झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची अधिकृत विभागणी करण्यात आणि नोंदणी प्रक्रियेत मोठा फायदा होणार आहे. महसूल खात्याच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती